मुंबई : राज्य भाजप संसदीय बोर्डाच्या महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित आहेत. राज्यातल्या लोकसभेसाठीच्या भाजप उमेदवारांची नावं राज्यातून निश्चित करुन दिल्लीला पाठवली जाणार आहे. त्यानंतर अंतिम यादी दिल्लीत ठरणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, आशिष शेलार उपस्थित आहेत.


महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक चार टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांवर, 18 एप्रिलला 10 जागांवर, 23 एप्रिलला 14 जागांवर तर 29 एप्रिलला 17 जागांवर मतदान होणार आहे. पुण्यात पहिल्यांदा 2 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर देशभरात आचार संहिता लागू झाली आहे.