मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झालं की प्रत्यक्ष कॉलेज सुर करण्याचा विचार सुरु आहे अशी माहिती माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. यासंदर्भात कुलगुरु आणि जिल्ह्याधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर कॉलेज सुरु करण्याचा विचार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक विभागात कुलगुरुंना जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगण्यात आलं आहे. वसतीगृह आणि कॉलेजची व्यवस्था पाहून येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान राज्यात पुन्हा कॉलेज सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. 


मात्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी कॉलेज सुरु होतील असं नाही. त्या भागातील कोरोनची स्थिती काय आहे यावर हा निर्णय घेतला जाईल. याबाबतचा अहवाल आमच्याकडे 15 दिवसांत येईल त्यानंतर यासंबंधीची माहिती दिली जाईल' असं उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हंटलं आहे.