दिपक भातुसे, मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज शासकीय विमानाने देहरादूनला आणि इथून कारने मसुरीला जाणार होते. यासाठी शासकीय विमानाची बुकींग करण्यात आल्याचं राज्यभवनातील सूत्रांनी सांगितलं. मात्र राज्यपाल विमानतळावर जाऊन शासकीय विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. राज्यपाल त्यांनंतर दुपारच्या १२ वाजून १५ मिनिटाच्या स्पाईसजेटच्या विमानाने देहरादूनला रवाना झाले. मसुरीला IAS प्रशिक्षण समारोप कार्यक्रमासाठी राज्यपाल उद्या हजर राहणार आहेत. त्या कार्यक्रासाठी त्यांना शासकीय विमान हवे होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- मुख्यमंत्री कार्यालयाने या दौऱ्याला मान्यता दिलेली नाही हे काल राजभवनाला कळवले देखील होते अशी माहिती आहे. 
- राज्यपाल कोणत्याही दौऱ्याला जाताना विमान हवं असेल की महाराष्ट्र विमान प्राधिकरण कडे अर्ज केला जातो.
- महाराष्ट्र विमान प्राधिकरण राज्यपाल त्याचे दौरे आणि त्यांच्या अर्जाची माहिती मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे पाठवते.
- मुख्यमंत्री कार्यालय त्यानुसार मान्यता देतात आणि विमानाच्या प्रवासाला परवानगी मिळते.
- राज्यपालांनी आपल्या दौर्याबाबत गेल्या आठवड्यात महाराष्ट्र विमान प्राधिकरण कडे अर्ज केला होता.
- याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडे देण्यात आली होती.
- पण राज्यपालांच्या देहराडून दौर्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगी मिळाली नाही.
- मुख्यमंत्री कार्यालयाने या दौऱ्याला मान्यता दिलेली नाही हे काल राजभवनाला कळवले देखील होते अशी माहिती आहे.
- राज्यपाल विमानात बसल्यावर मान्यता नाही हे कळल्यावर मग सगळीकडे पुन्हा फोन फोनी सुरू करण्यात आली.


'राज्यपालांना विमानाची परवानगी दिली नव्हती तरी ते विमानात जाऊन बसल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरोपीच्या कठड्यात उभं करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.