मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप अखेर तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाचा महाराष्ट्र बंद आणि रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून संप मागे घेत असल्याची घोषणा कर्मचारी संघटनांनी केली आहे. दुपारी 12 वाजता मुख्य सचिवांबरोबर झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्यात आला आहे. कालही सरकारने याच मुद्यावर संप मागे घेण्याची विनंती केली होती, मात्र तेव्हा कर्मचारी संघटनेनं आडमुठी भूमिका घेतली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये मार्ग काढण्यासाठी वित्तमंत्री तसेच मुख्य सचिवांसोबत बुधवारी झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नव्हता त्यामुळे तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला होता. २१ महिन्यांचा थकीत महागाई भत्ता सरकारने याच वर्षात दिल्यास संप मागे घेतला जाईल अशी भूमिका संघटनेची होती.