मंकीपॉक्स या आजारावर बृहन्मुंबईच्या वतीने नागरिकांसाठी सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. सध्या राज्य आरोग्य खाते मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांचे विलगीकरण आणि औषधोपचार साठी सज्ज असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबई विमानतळावर सुद्धा परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात संशयित रुग्णांच्या विलगीकरणासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. तसेच नागरिकांचे घेतलेले चाचणीनमुने तपासणी साठी NIV पुणे प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. आफ्रिकेतील देशांमधून मागील २१ दिवसांत प्रवास केलेल्या व्यक्तीमध्ये सदर आजाराची उल्लेख केलेली लक्षणे आढळली तर त्या व्यक्तीने तत्काळ नजीकच्या दवाखान्यात तपासून घ्यावे अशी सूचना आरोग्य खात्याने केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे जो प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय रेनफॉरेस्ट भागात आढळतो आणि इतर प्रदेशांमध्ये प्रसारित होत आहे. मंकीपॉक्सचे चिकिस्तिय सादरीकरण (clinical presentation) देवी रोगासारखे आहे.  देवी रोग हा ऑर्थोपॉक्सवायरल संसर्ग असुन 1980 मध्ये या रोगाचे संपूर्ण जगभरात निर्मूलन झाले असे घोषित केले होते. मंकीपॉक्स देवि रोगा पेक्षा कमी संसर्गजन्य आहे आणि कमी गंभीर आहे. या आजारा बद्दलची माहिती मुंबईतील सर्व खाजगी व शासकीय आरोग्य संस्था यांना देण्यात आली आहे. आजपर्यंत (23 मे 2022) भारतात मंकी पॉक्सचा कोणताही संशयित किंवा पुष्टी झालेला रुग्ण आढळलेला नाही.


मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव 
1)मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव प्राण्यांपासून मनुष्याला तसेच मनुष्यापासून मनुष्यास  होऊ शकतो.
2)हा विषाणू लहान जखमा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक, तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतो.
3)जनावरांच्या ओरखडे किंवा चाव्याव्दारे, तसेच वन्य जनावरांचे मांस खाणे या मध्यामांमधून या विषाणूचा प्रसार प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत  होऊ शकतो, शरीरातील द्रव किंवा घाव सामग्रीचा प्रत्यक्ष व अप्रत्याक्षपणे संपर्क किंवा दूषित बिछान्याद्वारे या आजाराचे मानवास संक्रमण होऊ शकते.
4)मानव-ते-मानवी संक्रमण प्रामुख्याने श्वसनाच्या मोठ्या थेंबांद्वारे (respiratory droplets) होते, तसेच ज्यांना सामान्यत: दीर्घकाळ जवळच्या संपर्काची आवश्यकता असते.
5) मंकीपॉक्स या विषाणूचा शरीतात प्रवेश झाल्यापासून ते प्रत्यक्ष लक्षणे दिसण्याचा  कालावधी.. साधारणतः 7-14 दिवसांचा असतो परंतु 5-21 दिवसांपर्यंत असू शकतो आणि या कालावधीत व्यक्ती सहसा संसर्गजन्य नसते. पुरळ दिसण्याच्या 1-2 दिवस आधी संक्रमित व्यक्ती हा रोग प्रसारित करू शकतो आणि सर्व खपली जाईपर्यंत संसर्ग राहू शकतो.


मंकीपॉक्स आजाराची लक्षणे 
1)मंकीपॉक्सची  सामान्यत: लक्षणे ताप येणे, पुरळ आणि मोठ्या प्रमाणात गाठी (lymph node) येणे. 
2)पुरळ पोट किंव्हा पाठी ऐवजी चेहऱ्यावर आणि हातपायांवर जास्त केंद्रित असते. 
3)मंकीपॉक्स या आजाराची लक्षणे 2 ते 4 आठवड्यांपर्यंत असतात.