मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाची एन्ट्री झाली आहे. मानवाधिकार आयोगाने रिया चक्रवर्तीच्या कूपर हॉस्पिटलच्या शवागृहात जाण्यावरुन नोटीस बजावली आहे. मानवाधिकार आयोगाने कूपर हॉस्पिटल आणि डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांना नोटीस पाठवून उत्तर मागवलं आहे. कोणत्या नियमाच्या आधारे रिया चक्रवर्तीला शवागृहात जाण्याची परवानगी देण्यात आली? नियमानुसार रक्ताचा नातेवाईक असलेली व्यक्तीच पार्थिवाजवळ जाऊ शकते, मग पोलिसांनी रियाला रोखलं का नाही? असे प्रश्न या नोटीसमध्ये हॉस्पिटल आणि पोलिसांना विचारण्यात आले आहेत. 


सुशांतसिंह प्रकरणात नवा ट्विस्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान सुशांतसिंह राजपूत प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. रिया चक्रवर्तीचे काही व्हॉट्सऍप चॅट समोर आल्यामुळे या प्रकरणात ड्रग्जचा संशय समोर आला आहे. या व्हॉट्सऍप चॅटमध्ये ड्रग्जबाबत बोलणी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिया ज्या मिरांडा सुशीसोबत चॅटिंग करत होती, तो दुसरा-तिसरा कोणी नसून सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आहे. 


ड्रग्जबाबतचे चॅट समोर आल्यानंतर सीबीआय आता सिद्धार्थ पिठानी, कूक केशव ठाकूर, कूक नीरज, हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, स्टाफ दिपेश सावंत यांच्यासोबत ड्र्ग्जबाबत चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ड्रग्जच्या बाबतीत काही तथ्य असेल, तर हीच माणसं माहिती देऊ शकतात, कारण ते सुशांत आणि रियासोबतच राहत होते.


याप्रकरणात ड्रग्जचा ऍन्गल समोर येत असेल, तर मग ड्रग्जचं सेवन किती दिवसांपासून होत होतं? ड्रग्ज रोज घेतली जात होती का फक्त पार्टीमध्येच? ड्रग्ज घेण्यात कोणाकोणाचा समावेश होता? ड्रग्ज कोण आणून देत होतं? आणि ड्रग्जचं सेवन शेवटी कधी करण्यात आलं? या सगळ्यांची उत्तरं सीबीआयला या सगळ्यांकडून मिळू शकतात.