दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे आता मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने मराठा विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

SEBC प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे. ९ सप्टेंबर २०२० नंतरचे सर्व प्रवेश SEBC वर्गासाठी आरक्षण न ठेवता करण्याचा निर्णय
 राज्य सरकारने घेतला आहे.


९ सप्टेंबर २०२० पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत, मात्र त्यांना प्रवेश देण्यात आलेले नाहीत, अशा SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे प्रवेश मराठा आरक्षण उठवण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेच्या निकालाच्या अधीन असतील.