मुंबई : विधीमंडळच्या कामकाजात पंकजा मुंडेंनी अंगणवाडी सेविकांवर लावलेला मेस्मा कायदा हटवण्यास स्पष्ट नकार दिल्यावर आज मुख्यमंत्र्यांनी सरकारी निर्णयला स्थगिती दिली आहे. आज सकाळी कामकाज सुरू होताच मु्ख्यमंत्र्यांनी विधानसभेत याप्रकरणी निवेदन दिलं. सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन तूर्तास मेस्मा स्थगित करत आहोत अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली. तुटपुंज्या पगारात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांवर मेस्मा लावणे चुकीचं असल्याचा विरोधकचं म्हणणं होतं. 


विरोधकांचा आक्रमक पवित्रा


मेस्मा हटला नाही, तर कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला होता. सरकारनं एक पाऊल मागे घेतल्यानं तिढा सुटलाय. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विखे पाटलांनी सरकारवर खोचक शब्दात टीका केली. मातोश्रीनं कान टोचल्यावर स्थगिती दिल्याचा दावा यावेळी विखे पाटलांनी केला. तसेच हे सरकारला उशीरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीकाही विरोधकांनी केली आहे. आदिवासी भागात अंगणावाडी सेविकांच्या संपाचा सर्वाधिक परिणाम झाल्याचं यावेळी सरकारच्या वतीने सांगण्यात आलं.