मुंबई : High Court slams Maharashtra government : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी ( Offensive Social Media Posts) निखील भामरे नावाच्या विद्यार्थ्यांला अटक झाली आहे. यावरुन उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडेबोल सुनावले. दररोज शेकडो आणि हजारो ट्वीट होतात. प्रत्येक ट्वीटची तुम्ही दखल घेणार आहात का, असा सवाल न्यायालयाने विचारला. (Students arrested for posting offensive posts against Sharad Pawar, High Court slams Maharashtra government)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने अशीच कृती केली तर शरद पवार यांच्या नावाला गालबोट लागेल असे न्यायालयाने खडेबोल सुनावताना म्हटले आहे. महिन्याभरापासून निखील भामरे हा मुलगा अटकेत आहे. अशा प्रकारच्या एफआयआर नको आहेत, असे न्या. एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला सुनावले. भामरेने आपल्यावरील गुन्हा रद्द व्हावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.


शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक करण्यात आल्यानंतर ती जेलमध्ये आहे. न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. केतकी चितळे हिच्यावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात केतकीच्या वकिलांकडून जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला होता. त्यावरील सुनावणीत न्यायाधीशांनी हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने जामीन देण्यात येऊ शकत नाही असे मत नोंदवले आहे. केतकी हिने पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केले होते.