Mumbai News : मुंबई लोकल (Mumbai local) ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. या मुंबई लोकलने (Local Train) रोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. अशा वेळी त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील उपस्थित होत असतो. यासाठी रेल्वे पोलीस (RPF) स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवाशांना कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतात. पण काही प्रवासी हे स्वतःच जीव धोक्यात घालून लोकल ट्रेनमधून प्रवास करत असतात. अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. प्लॅटफॉर्म येण्याआधीच एका तरुणाने ट्रेनमधून खाली उडी मारल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याची तरुणाई ही धोका पत्करुन एखादा स्टंट करण्याला खूप जिगरीचे काम समजते. अशा खतरनाक स्टंटशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. मुंबई लोकल ट्रेनमधील या तरुणाच्या स्टंटबाजीचा एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण ट्रेनच्या बाहेर दरवाजाचा खांब धरून स्टंटबाजी करत आहे. या तरुणाने ट्रेन प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वीच चालत्या ट्रेनमधून उडी मारली.


या तरुणाने लोकल ट्रेनमध्ये लटकून कुर्ला ते मानखुर्द असा प्रवास केला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ट्रेन भरधाव वेगाने धावताना दिसत आहे. हा तरुण ट्रेन फलाटावर येण्यापूर्वीच फूटबोर्डच्या खाली गेली आणि त्याने धोकादायकपणे खाली उडी मारली. ती व्यक्ती वाटेतच ट्रेनमधून उतरणार होती. ट्रेनचा वेग थोडा कमी होताच त्या व्यक्तीने ट्रेनमधून खाली उडी मारली. सुदैवाने ट्रेनचा वेग जास्त नव्हता. वेग जास्त असता तर तरुणाचा भीषण अपघात झाला असता.


जेव्हा हा तरुण फूटबोर्डखाली लटकत होता तेव्हा ट्रेनमध्ये असलेल्या एका व्यक्तीने त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मुंबई विभागाने या घटनेची दखल घेतली आणि असे स्टंट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले.



पोलिसांचे कारवाईचे आश्वासन


हा व्हिडीओ समोर आल्यानंतर रेल्वेने याची गंभीर दखल घेतली आहे. रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे आरपीएफला कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यानंतर मध्य रेल्वे आरपीएफने ही बाब रेल्वे संरक्षण दल मुंबई विभागाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर "माहितीबद्दल धन्यवाद. हे प्रकरण आवश्यक कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहे. तुमची तक्रार गांभीर्याने घेत, अहवाल खालीलप्रमाणे आहे की कुर्ला सोडल्यानंतर ट्रेन टिळक नगर रेल्वे स्थानकावर थांबते. या भागात कोणी असे स्टंट करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल," असे आरपीएफ म्हटलं आहे.