मुंबई : राज्याचे तत्कालीन तंत्रशिक्षण संचालक सुभाष महाजन यांनी सॉफ्टवेअरची खरेदी घोटाळ्याप्रकरणी आपले मौन अखेर सोडले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्कालीन तंत्रशिक्षण संचालक सुभाष महाजन यांच्याविरोधातील एट्रोसिटीचा गुन्हा, खरेदी आणि इतर गैरव्यवहारा संबंधीचे वृत्त झी २४ तासने प्रसिद्ध केले होते. सुरवातीला या प्रकरणी प्रतिक्रिया देण्याचं सुभाष महाजन यांनी टाळलं होतं. मात्र, आता त्यांनी झी २४ तासकडे लेखी स्पष्टीकरण पाठवलं आहे.  सुभाष महाजन यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे काय स्पष्टीकरण दिले आहे. 


मी पदावर कार्यरत असताना, विकिपीडिया नावाच्या किंवा तशा सॉफ्टवेअरची खरेदी करण्यात आलेली नाही. माझा न्याय व्यवस्थेवर आणि शासन व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे या प्रकरणी न्यायालय किंवा शासनाकडून जो निर्णय घेतला जाईल तो मा झ्यावर बंधनकारक आहे, असे ते म्हणालेत.