मुंबई : महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आज सेवानिवृत्त झालेत. राज्यात दत्ता पडसलगीकर यांच्यानंतर त्यांच्याजागी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आलीय. दत्ता पडसलगीकर यांच्यानंतर सेवा जेष्ठतेनुसार सुबोध जयस्वाल यांचाच क्रमांक लागतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर, सुबोध जयस्वाल यांची माहाराष्ट्राच्या 'पोलीस महासंचालक' नियुक्ती झाल्यानंतर रिक्त झालेल्या 'मुंबई पोलीस आयुक्त' पदावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संजय बर्वे यांची नियुक्ती करण्यात आलीय. संजय बर्वे हे १९८६ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.


ऑगस्ट महिन्याच्या शेवटी दत्ता पडसलगीकर हे निवृत्त होणार होते. मात्र राज्य सरकारनं त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये आणखी तीन महिन्यांची मुदत वाढवून दिली होती. राज्य सरकारला पडसलगीकरांना दोन वर्षांची मुदतवाढ द्यायची होती मात्र केंद्र सरकारनं राज्याची मागणी फेटाळून लावली.