11 महिन्याच्या सेरेब्रल पाल्सीग्रस्त बाळावर यशस्वी उपचार, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव
सेरेब्रल पाल्सीचा उपचार (cerebral palsy treatment) करण्यासाठी वापरल्या जाणार्या `सँडविच प्रोटोकॉल` नावाच्या रिजनरेटिव्ह सेल्युलर औषधाची (Regenerative cellular medicine) नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
मुंबई : सेरेब्रल पाल्सीचा उपचार (cerebral palsy treatment) करण्यासाठी वापरल्या जाणार्या "सँडविच प्रोटोकॉल" नावाच्या रिजनरेटिव्ह सेल्युलर औषधाची (Regenerative cellular medicine) नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. मुंबई येथील डॉ. प्रदीप महाजन, रिजनरेटिव्ह मेडिकल रिसर्चर, सेरेब्रल पाल्सीग्रस्त रूग्णाच्या उपचारासाठी स्टेम सेल्स थेरपीच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या प्रगतीसाठी त्यांचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सेल्युलर थेरपी आणि रिजनरेटिव्ह मेडिसिनच्या वापराद्वारे शरीरातील पेशींमध्ये असलेल्या समस्येचे मूळ कारण शोधून ते नाहिसे करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाते. डॉ. प्रदीप महाजन हे एक अनुभवी आरोग्य तज्ज्ञ आहेत. ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापीठातून पदवी प्राप्त करणारे स्टेम सेल संशोधक आहेत. डॉ प्रदीप महाजन म्हणाले की, नवीन तंत्रज्ञान आजार व्यवस्थापनाच्या विद्यमान मर्यादांसह सामान्य माणसाचे जीवन बदलू शकते. त्यामुळे पुनरुत्पादक औषधांची नवीन शाखा तसेच सध्याच्या उपचारांच्या पारंपारिक पद्धतींचा उपयोग करून लोकांची जीवनशैली सुधारण्याची आशा आहे.
सेल्युलर थेरपी जसे की एव्हस्क्यूलर नेक्रोसिस, संधिवात, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटीस, ऑस्टियोआर्थरायटीस, सेरेब्रल पाल्सी, स्ट्रोक, मधुमेह, यकृत, जननेंद्रियाच्या विकार, त्वचारोगविषयक परिस्थिती यासारख्या आजारांवर सेल्युलर थेरपीचा उपयोग करून बर्याच आजारांवर उपचार केले जाऊ शकतात. ब-याचश्या रुग्णांना सेल्युलर थेरपीचे फायदे देखील मिळू शकतात. अवयव प्रत्यारोपण, शारीरीक विकासादरम्यान उद्भवणारे दोष, कर्करोग, इम्युनोथेरपी इत्यादींच्या नकात्मक परिणामांकरिता तसेच निकामी अवयवाच्या योग्य व्यवस्थापनात अशा थेरपीचा कशाप्रकारे वापर करता येईल याबाबतही संशोधन करण्यात येत आहे.
सेल्युलर थेरपीमधील आमच्या कामाची दखल घेतल्याबाबत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा आभारी आहे. डॉक्टरांच्या संपूर्ण टीमचे ज्यांनी 11 महिन्याच्या बाळावर यशस्वीरित्या उपचार केले आणि त्याला नवीन आयुष्य बहाल केले. दिले, या सर्वांकरिता ही एक अभिमानाची गोष्ट आहे. याचा मला आनंद होतो असेही डॉ. महाजन यांची स्पष्ट केले.