COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे. देशाचे पंतप्रधान जर ओबीसी आहेत तर एकनाथ खडसेंवर अन्याय कसा? असा सवाल अर्थमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी उपस्थित केलाय. त्याचप्रमाणे खडसे यांच्या नाराजी संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधणार असल्याचंही मुनगंटीवारांनी म्हटलंय. तर कुठल्याही फाईलवर सही करताना भुजबळांनी सद्सद् विविकेबुद्धीचा वापर करुन सही करायला हवी होती. असा टोला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते छगन भुजबळ यांना लगावला.


राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाल्याची भावना केवळ विरोधकांकडूनच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडूनही व्यक्त केली जात आहे. भुजबळांवर अन्याय झाल्यामुळे ओबीसी समाज भुजबळांच्या पाठीशी उभा असल्याची वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसेंनी केलंय. भुजबळांसोबत ओबीसींच्या समस्यासाठी एकत्रित लढा देणार असल्याचं खडसेंनी जाहीर केलं. तुरुंगातून सुटल्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर गेलेत. नाशिकमध्ये भुजबळांचे जोरदार स्वागत करण्यात आले.