मुंबई :  विधानसभेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावावर भाषण केले. भाजपनेते सुधीर मुंगटीवार यांनी यावेळी विरोधकांवर टीका करीत घणाघाती भाषण केले.


सुधीर मुंगटीवार यांच्या भाषणातील मुद्दे


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    या सत्य असत्य धर्म अधर्माच्या युद्धामध्ये शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने बहुमताचा कौल देणाऱ्यांना ईश्वराने भरभरून आशिर्वाद द्यावेत. 

  • राज्याच्या चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या मतदारांनी 2019ला युतीच्या सरकारच्या बाजूने कौल दिला. कॉंग्रेसला झटका आणि राष्ट्रवादीला फटका दिला. यांनी विरोधातच बसावं असा कौल मतदारांचा होता. परंतू दुर्दव्याने 24 ऑक्टोबर 2019 चा तो अशुभ मुहूर्त महाराष्ट्राने पाहिला. या दिवशी एक हिंदुत्ववादीपक्ष अशा पक्षासोबत गेला ज्या पक्षाला प्रभु श्रीराम काल्पनिक पात्र वाटतं. 

  • एकनाथ शिंदे सारखा कार्यकर्ता गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री होता. दीन दुबळ्या अदिवासींच्या कल्याणासाठी झटणारा माणुस या राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसला. आणि त्यांच्या अभिनंदनाचा आज दिवस आहे.  तरीसुद्धा विरोधकांमध्ये सत्ता गेल्याचे दुःख आणि वेदना आपण पाहत होतो. 

  • अजित पवार विचारतात की, तुम्ही तिकडे गेलात तर, कसे निवडून येणार ? त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, जसे तुम्ही 23 नोव्हेंबर रोजी तिकडून इकडे आलात आणि उपमुख्यमंत्री झालात. तोच आदर्श आहे. जयंतराव तुम्ही इकडे आला नाहीत. म्हणून तुम्ही कधी उपमुख्यमंत्री झाला नाहीत. असा मिश्किल टोला मुंगटीवार यांनी लगावला.

  •  

  • शिवसेनेच्या भास्कर आव्हाड यांना उद्देशून मुंगटीवार म्हणाले की, आमचे एक मित्र जोशात भाषण देत होते. ते खरं तर पूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते. आमच्यासोबत कोण कधी येईल सांगता येत नाही. मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन प्रस्तावावरही बोलताना तुम्ही नकारात्मकच बोलत आहात. अशी टीका मुंगटीवार यांनी भास्कर जाधव यांच्यावर केली.

  • 'तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहें ना', या भावनेने देवेंद्र फडणवीस काम करीत आहेत. ज्यांना फक्त खुर्चीच माहितीये, वंशवाद माहितीये, परिवारवाद माहितीये त्यांना त्याग, सेवा, समर्पण कसं कळणार? 

  • सर्जिल उस्मानीने हिंदुंबद्दल नीच शब्द वापरले, तुम्ही कारवाई हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांवर करीत होते. बरं संबधीतांनी ती म्हटलीही नाही. तरी त्यांना तुरूंगात टाकलं. 

  • ज्या आमदारांना मतदारसंघातील 3 लाख लोकांनी निवडून दिलं त्यांना तुम्ही वराह म्हणता. ही तुमची संस्कृती? खरं तर प्रभू विष्णूने दुष्ठांच्या संहारासाठीही वराह अवतार धारण केला होता. 

  •  

  • 16 मार्च  1995 ला भाजप शिवसेनेच्या आमदारांना स्व. बाळासाहेब ठाकरे कार्ल्याच्या देवीच्या दर्शनासाठी घेऊन गेले होते. तेथे सर्वांनी कॉंग्रेससोबत कधीही न जाण्याची शपथ घेतली होती. कोणी खोटी ठरवली ही शपथ?

  • स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या नेत्याला आपण कधीही मंत्री होऊ देणार नाही, ही आपल्या पित्याची प्रतिज्ञा कोणी खोटी ठरवली. सत्तेचा अहंकार त्यांना किती चढला होता ते पहा!