मुंबई : जवळपास दीड महिन्यांच्या सुट्टीनंतर आजपासून राज्यातील शाळांमध्ये पहिली घंटा वाजणार आहे. नवीन वह्यापुस्तके, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसासाठी सज्ज झाले असून, शाळांनीही विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून अनेक शाळांत स्वतः मुख्याध्यापक आणि शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. अन्य बोर्डांच्या शाळा आधीपासूनच सुरू झाल्या असल्या, तरी राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहेत. पहिल्या दिवशीच्या घंटेसाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.


सध्या राज्यभरात एकूण एक लाख तीन हजार ६८५ शाळा आहेत. त्यापैकी ६७ हजार ७१७ शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत, २१ हजार २६१ अनुदानित तर, १३ हजार ९८८ विनाअनुदानित शाळा आहेत. यापैकी विदर्भ वगळता सर्व शाळा गुरुवारपासून सुरू होणार आहेत. विदर्भात २६ जूनला शाळा सुरू होतील.