मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या लोकांनी आज बाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्कीच वाचा. रविवारी 7 एप्रिल रोजी मध्ये रेल्वेचा मुंबई डिविजनचा वेगवेगळ्या इंजीनियरिंग सेवा आणि देखरेखीकरता मेगाब्लॉक असणार आहे. या कारणांमुळे काही लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत तिन्ही रेल्वे लाईनवर मेगाब्लॉक असणार आहे. आज मध्य आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे. सेंट्रलवर माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामं केली जातील. तर, ठाणे आणि वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरही ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत पूर्ण लोकल सेवा बंद राहील. 


मध्य रेल्वे - मुख्य लाइन 


मार्ग - अप डाऊन धिम्या गतीने धावेल 
स्थानक - माटुंगा ते मुलुंड 
वेळ - सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत 
या मेगाब्लॉक दरम्यान धिम्या गतीने धावणाऱ्या लोकल फास्ट रुटवर डायवर्ट करण्यात येणार आहे. तसेच काही लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. 


हर्बल रेल्वे लाइन 


मार्ग - अप डाऊन दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक 
स्थानक - ठाणी ते वाशी आणि नेरुळ 
वेळ - सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 वाजेपर्यंत 
ट्रान्स हार्बर ठाणे ते वाशी आणि नेरुळ आणि ठाणे ते नेरुळ-पनवेल असा अप डाऊन मार्गावर मेगाब्लक असेल. 


(हे पण वाचा - प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 7 दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक, कसं असेल लोकलचं वेळापत्रक? वाचा)


पश्चिम रेल्वे 


मार्ग - अप डाऊन मार्गावर मेगाब्लॉक 
स्थानक - माहिम ते अंधेरी 
वेळ - 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 


या मेगाब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वांद्रा-सीएसएमटी आणि सीएमएमटी-गोरेगाव मार्गांवर काही लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. चर्चगेट ते गोरेवर काही लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल रेल्वे लाइनवर घाटकोपर आणि भांडूप दरम्यान विक्रोळी फ्लायओव्हरच्या गर्डरचे काम सुरु आहे. यामुळे सेंट्रल रेल्वेने सहा दिवसांच्या रात्री विशेष ट्र‌ॅफिक ब्लॉकची घोषणा केली आहे. शनिवारी 6 एप्रिल रोजी रात्री ते गुरुवार 11 एप्रिलच्या मध्यमात्रीपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. शनिवारी मध्य रात्रीपासून सकाळी 4.05 वाजेपर्यंत तीन तासांचा मेगाब्लॉक असणार आहे.