मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या वेळेत  मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे रविवारी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ९.३० ते २.५६ वाजेपर्यंत सुटणा-या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील  आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला येथे थांबून पुढे विद्याविहार येथे धिम्या मार्गांवर वळविण्यात येतील.


 घाटकोपर येथून सकाळी ९.३८ ते दुपारी २.४८ पर्यंत सुटणा-या जलद मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात  येतील आणि  कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबतील.


 धिम्या मार्गांवरील सेवा मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार येथे उपलब्ध होणार नाहीत.  या स्थानकांच्या प्रवाशांना परळ, दादर, कुर्ला आणि घाटकोपर स्थानकांमधून जाण्याची परवानगी राहिल.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०० ते  दुपारी ४.०० या वेळेत येणा-या/जाणा-या सर्व धिम्या लोकल सेवा ब्लॉकच्या कालावधीत वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.


 पनवेल-वाशी अप व डाउन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे.  पनवेल / बेलापूर येथून सकाळी १०.३३ ते दुपारी  ४.०१ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणारी हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून डाउन हार्बर मार्गावर बेलापूर / पनवेल येथून  सकाळी ९.४४ ते दुपारी ३.१६ दरम्यान सुटणा-या हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेलहून दुपारी २.२४ वाजता ठाणेकडे जाणारी  व ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे येथून दुपारी १.२४ वाजता पनवेलला जाणारी सेवा बंद राहील.


 तथापि, ब्लॉक काळात हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी विभाग आणि  ट्रान्स- हार्बर मार्गावर  ठाणे-वाशी विभागांत विशेष गाड्या धावतील.पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत.