मुंबई : पश्चिम, हार्बर रेल्वेवर देखभाल आणि दुरुस्तीसाठी आणि मध्य रेल्वेवर परळ टर्मिनसकडील नवीन प्लॅटफॉर्मच्या कामासाठी रविवार, २० जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते भाईदर स्थानकादरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. 


परळ टर्मिनसचे काम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेवर परळ टर्मिनसच्या कामासाठी रविवार, सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत भायखळा ते माटुंगा डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल सेवांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. या कालावधीत सीएसएमटीहून जाणाऱ्या धीम्या लोकल सकाळी ९.४९ ते सायंकाळी ५.४८ वाजता या वेळेत भायखळा ते माटुंगा स्थानकामध्ये जलद मार्गावर चालवण्यात येतील. त्यानंतर पुन्हा धीम्या मार्गावर चालवल्या जातील. 


लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस रद्द


या लोकल चिंचपोकळी, करी रोड स्थानकावर थांबणार नाही. तसेच ब्लॉक दरम्यान ११०१०/११००९ पुणे-मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस, २२१०२/२२१०१ मनमाड-मुंबई-मनमाड राज्यराणी एक्सप्रेस, १२११०/१२१०९ मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, १२१२४/१२१२३ पुणे-मुंबई-पुणे डेक्कन क्विन एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.


पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदर स्थानकामध्ये रविवारी स. ११ ते दु. ३ पर्यंत अप-डाउन जलद मेगा ब्लॉक चालणार आहे. विरार ते गोरेगावपर्यंत चालणार्या ब्लॉक मध्ये विरार/वसई ते बोरिवली आणि बोरीवली ते वसई/विरार दिशेने जाणार्या सर्व जलद लोकल या धीम्या मार्गावर चालतील.