मुंबई : घाटकोपर इमारत दुर्घटनेतील आरोपी सुनील शितप आणि अनिल मंडल या दोघांना ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांना विक्रोळी कोर्टात हजर करण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी वकीलांनी पालिकेकडून तसंच विविध एजन्सीकडून काही अहवाल येणं बाकी असल्याने चौकशीकरिता पोलीस कोठडी वाढवून द्यावी असा युक्तीवाद करण्यात आला. त्यावर कोर्टाने दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.


घाटकोपरच्या सिद्धीसाई इमारत दुर्घटनेत १७ जणांचा बळी गेलाय. याच इमारतीच्या तळमजल्यावर शितपचं नर्सिंग होम होतं. या नर्सिंग होममध्ये नुतनीकरणाचा घाट घातला होता. यादरम्यान इमारतीच्या मूळ पायाला धक्का लागल्यानं दुर्घटना घडली, असा स्थानिकांचा आरोप आहे.