मुंबई : महाराष्ट्र सरकार आणि झी २४ तासने २४ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान महाअवयव दान मोहीम आयोजित केली आहे. यामोहिमेला डबेवाल्यांनी पाठिंबा दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२४ ऑगस्टपासूनच या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईतल्या प्रभादेवी इथल्या सिद्धीविनायक मंदिरात मुंबईच्या डबेवाल्यांनी या मोहिमेला पाठींबा देत अवयवदानाची शपथ घेतली. 


तसंच झी २४तासच्या या उपक्रमाचं कौतुक करत अवयवदानाचा अर्जही भरला. इतरांनीही या अवयवदान अभियानात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.