मुंबई : बहिण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. देशभरात हा सण साजरा केला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही रक्षाबंधनाचा सण साजरा केला. संपूर्ण कुटुंबियांसमवेत त्यांनी हा सण साजरा केला. 


सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन रक्षाबंधनाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केलेत. “आजचा रक्षाबंधनाचा सण कुटुंबियांसोबत साजरा केला. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.!!” असं त्यांनी ट्विटरवर म्हटलंय. राजकारणात अजित पवार यांची ओळख अजितदादा अशी आहे तर सुप्रिया सुळे यांना ताई म्हटलं जात.