Maharashtra Politics, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविषयी बोलताना  कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची जीभ घसरली. सोमवारी सत्तार यांनी अत्यंत गलिच्छ भाषेत सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. याचे पडसाद राज्यभर पसरले. राष्ट्रावदीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. सत्तार यांच्या मुंबईतील निवस्थानी तोड फोड झाली तर, औरंगाबाद येथील त्यांच्या राहत्या घरावर दगफेक करण्यात आली. या सर्व प्रकरणावर आता सुप्रिया सुळे यांनी मौन सोडले आहे.  शिवीगाळ प्रकरणार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर  त्यांनी ट्विट करत थेट अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. 


अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले, याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण, अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात असं ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तार यांन टार्गेट केले आहे.  


सगळेच तारतम्य पाळतात असे नाही


परंतु सगळेच तारतम्य पाळतात असे नाही.  जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या,  संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे मत देखील सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये मांडले आहे. 


 राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचना


मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया अशा सूचना त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केल्या आहेत. 


सुप्रिया सुळे यांनी सर्वांचे आभार मानले 


याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा 'सुसंस्कृतच महाराष्ट्र' आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. 
धन्यवाद.  जय हिंद-जय महाराष्ट्र ! असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.