माझा दादा परत आलाय - सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या परतीनंतर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : आज विधानसभेचे विशेष अधिवेशन होत आहे. सकाळी आठ वाजता नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी होत आहे. महाराष्ट्र विकासआघाडीचे आमदार विधानभवनाकडे रवाना झालेत. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या परतीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा हा माझा दादा आहे. भावा बहिणीचे नाते तुटायला नको. माझा दादा परत आला आहे असून सांगून राष्ट्रवादीच्या आमदारांचा संघर्ष, ऐक्याचा सार्थ अभिमान असे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्यात. त्याचवेळी त्यांनी विधिमंडळात अजित पवार गळाभेट घेतली. त्यामुळे बहीण-भावाचे नाते संपूर्ण महाराष्ट्राने पुन्हा एकदा पाहिले आहे. आपले कुटुंब एक आहे, हेच दाखवून दिले.
तसेच पवार कुटुंबात कोणतेही मतभेद नसून सगळे काही ठीक आहे, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्यात, येत्या पाच वर्षांत जनतेच्या मनातला महाराष्ट्र घडवू. नवनविर्वाचित आमदारांचा शपथविधी आज पार पडणार असून त्यांच्या स्वागतासाठी सुप्रिया सुळे सकाळीच विधानभवनात दाखल झाल्या आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आमदारांनी ऐक्य दाखवले याचा सार्थ अभिमान असल्याचे त्या म्हणाल्यात. गेल्या काही दिवसांपासून आमदारांच्या मनातही संघर्ष सुरु होता. त्यांची मनस्थिती मी समजू शकते. मी आमदारांचे स्वागत करण्यासाठी आले आहे.
आज राज्यासमोर अनेक आव्हाने आहेत. महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे. त्यासाठी जे लागतील ते कष्ट करु. विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना विरोधातील आवाज दाबण्याचं काम आम्ही कधी करणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.