COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : प्रसाद लाड यांच्यावर आरोप करीत सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले, यावर प्रसाद लाड यांनी माणूस मोठा झाला की, आरोप होत असतात आणि राष्ट्रवादीने माझा धसका घेतला आहे, असे आरोपाला उत्तर देताना लाड यांनी म्हटलं आहे, तसेच माझ्या कंपनीवर कोणताही गुन्हेगारी आरोप नाहीत, जे आरोप केले, ते सर्व खोटे होते तर केंद्रातल्या एजन्सीने अभ्यास करून आमचे काम पुन्हा एकदा सुरू झाले आहे. मानवी तस्करीच्या आरोपावर बोलताना केंद्रीय कमिटीने मला क्लीन चिट दिली आहे, शरद पवार म्हणायचे की, ज्या वेळेला टीका होते त्यावेळेस माणूस मोठा होतो, आता तर सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीने माझा धसका घेतला आहे, माझी राजकीय ताकत वाढत आहे, माझ्या ताईने दिलेली ही वाढदिवासाची गिफ्ट असल्याचे ही त्यांनी सांगितले. 


भाजपाचे विधानपरिषदेतील आमदार प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल एव्हिएशन सर्व्हिसेस या कंपनीवर मानवी तस्करीचे आरोप होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरद्वारे यांना याप्रकरणी टार्गेट केलं आहे. या ट्टीवटमध्ये सुप्रिया सुळे यांनी ब्यूरो ऑफ सिविल एव्हिएशनच्या अहवालाचा दाखला दिला आहे. 


एवढा गंभीर आरोप असताना प्रसाद लाड भाजपामध्ये पावन झाल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यादेखत हे होतंय, हाच तुमचा पारदर्शक कारभार आहे का?, असा सवाल सुळे यांनी ट्विटमध्ये केलं आहे.