शिवसेना नेत्याचा सुशांतच्या कुटुंबियांवर मोठा आरोप; प्रॉपर्टीसाठी दिलं जातं होतं ड्रग्स
सुशांतच्या मृत्यू हा आत्महत्येतूनच
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणातील राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही. आता शिवसेनेतील एका मोठ्या नेत्याने सुशांतच्या बहिणींवरच गंभीर आरोप लावले आहेत. सुशांतच्या मालमत्तेसाठी त्यांनी त्याला ड्रग्स दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
'सुशांत सिंहची बहिण त्याला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय काही औषध देत होती. ज्यामुळे तो ड्रग्सच्या आहारी जाईल आणि त्याची प्रॉपर्टी हडप करता येईल? असा त्यांचा डाव होता का? या अँगलने तपास होण्याची गरज आहे. त्यामुळं मी मुंबई पोलीस आयुक्तांना यासंदर्भात तपास करण्याची विनंती केली,' असं शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
या संदर्भात त्यांनी काही ट्विट केले आहेत. या ट्विटमधून
मुंबई पोलिसांना केवळ ट्रोलिंगच नव्हे तर सोशल मीडियावरून शिविगाळही केली गेली अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली नाही. मुंबई पोलिसांना बदनाम केले जात होते. एका ठराविक हेतूने हे कॅम्पेन चालवले जात होते. अनेक फेक अकाऊंटची ओळख पटलेली आहे. हे कोण चालवत होते, त्यामागे कोण होते. याचा तपास सुरू आहे. हजारोंच्या संख्येनं ही फेक अकाउंट असल्यांचं परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे. देशाबाहेरून काही अकाऊंट असण्याची शक्यता आहे.
कोवीड युद्ध लढत असताना मुंबई पोलिसांचे नाव खराब करण्यासाठी हे षडयंत्र कुणी रचले हे समजत नाही. यामागे वेस्टेड इंटरेस्टेड आहे. सुशांत सिंह यांच्या बहिणीवर दाखल असलेला प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे दिल्याचा एफआयआर त्याच दिवशी सीबीआयकडे ट्रान्सफर केला होता. असं देखील मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटले आहे.