मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या तपासाप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन करा, अशी मागणी करणारं पत्र भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे. 'परमबीर सिंह यांच्या हकालपट्टी बाबत दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते, त्याचे साधे उत्तर देण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही, त्यामुळे पंतप्रधानांना पत्र पाठवावे लागले. घटनेने पंतप्रधानांना तसा अधिकारही दिला आहे', असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


परमबीर सिंग यांच्यासोबतच वांद्रे विभागाचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्याही निलंबनाची मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे. परमबीर सिंग आणि अभिषेक त्रिमुखे यांची चौकशी करावी, असंही भातखळकर म्हणाले आहेत. 


सुशांतसिंह प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केला, तसंच आता सीबीआयकडून पोलिसांची चौकशी सुरू केली आहे. या स्थितीमध्ये दोन्ही अधिकारी आपआपल्या पदावर राहणं न्यायाच्या दृष्टीने अत्यंत हानीकारक होईल, असं वक्तव्य भातखळकर यांनी केलं आहे.