सुशांत आत्महत्येप्रकरणी अस्लम शेख यांची उडी, केलीय `ही` मागणी
केंद्राला वाटत असेल तर सुशांत प्रकरणी सीबीआय चौकशी करावी
मुंबई : सुशांत सिंह प्रकरणाच्या वादात काँग्रेसचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी उडी घेतलीय. केंद्राला वाटत असेल तर सुशांत प्रकरणी सीबीआय चौकशी करावी असे विधान अस्लम शेख यांनी केलंय. याप्रकरणी काहीजण मीडियासमोर यायला मिळतंय म्हणूज वाद निर्माण करत आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे शूटिंग नाही, काम नाही म्हणून काहीजण वक्तव्य करत आहेत.
मुंबईतील धार्मिक स्थळं पुन्हा सुरु करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत असून लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असेही अस्लम शेख यांनी दिली आहे.
मुंबईतील मशीदींच्या विश्वस्तांच्या शिष्टमंडळासोबत अस्लम शेख यांच्या दालनात सोमवारी पार पडलेल्या बैठकीनंतर अस्लम शेख बोलत होते. या बैठकीला वेगवेगळ्या मशिदीचे विश्वस्त उपस्थित होते.
ऐतिहासिक मिनारा मशिदीचे विश्वस्त आसिफ मेमन यांनी फर्ज नमाजसाठी विशिष्ट वेळा ठरवून देण्याची मागणी केली. तर जामा मशिदीचे शोहेब खतिब यांनी देशभरामध्ये चालू असलेल्या अनलॉकच्या प्रक्रिये अंतर्गत मशिदींबरोबरच अन्य धर्मांची धार्मिक स्थळं दर्शनासाठी खुली करण्याची मागणी केली.
अस्लम शेख यांनी धार्मिक स्थळं सुरु करण्याबाबत सरकार गांभिर्यांने विचार करत असून लवकरच याबाबतचा ठोस निर्णय घेतला जाईल असं म्हटलं आहे.