मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 52व्या आत्मार्पण वर्षानिमित्त, मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्या आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी राष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांना अभिवादन करत त्यांच्या कुटुंबीयांचा गौरव करण्यात आलं. त्यानंतर युद्धात दिव्यांग सैनिकांचा सत्कार करण्यात आला. 


स्वतंत्रते भगवती


 तसंच भारतीय सैन्यदलातर्फे तुमच्या लष्कराला ओळखा या नावानं, विशेष शस्त्र प्रदर्शन कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे.


केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या निमित्तानं स्वतंत्रते भगवती हा गाण्यांचा विशेष कार्यक्रम ही सादर होत आहे.