मुंबई : सध्या सणवाराचे दिवस आहेत. गणेशोत्सवात बाप्पाला नैवेद्य म्हणून पेढ्यांचा प्रसाद दाखवला जातो. दर्शनासाठी आलेल्या पाहुण्यांना मिठाई (Sweets) दिली जाते. मात्र बाजारातून पेढे, मिठाई खरेदी करताना सावध राहा. हा प्रसाद तुमच्या जीवावरही बेतू शकतो. कारण ऐन सणासुदीच्या काळात भेसळखोरांनी (Adulterated) पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. बनावट खवा आणि भेसळयुक्त पाम तेलाचा वापर बनवलेल्या पेढ्यांची आणि मिठाईची सर्रासपणे विक्री साईबाबांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक शिर्डीला (Shirdi) भेट देतात. साईंचं दर्शन घेतल्यानंतर प्रसादाचे पेढे आवर्जून घेतात. मात्र याच प्रसादात भेसळ केली जातेय. कारण अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत शिर्डीतल्या साई मंदिराबाहेर मिळणारा पेढा विना दुधाचा बनत असल्याचं समोर आलंय. नाशिकमध्ये जप्त करण्यात आलेल्या 1100 किलो खव्यापैकी शंभर ते दीडशे किलो खवा शिर्डीतल्या पेढे विक्रेत्यांचा असल्याचं स्पष्ट झालंय. प्रसादाचा मलई पेढा सांगून या पेढ्याची 500 ते 600 रूपये किलो दरानं विक्री केली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय त्रास होतो?
भेसळयुक्त पेढे किंवा मिठाई खाल्ल्ल्यास घशात खवखव होते, खोकला येतो आणि पोटात दुखतं. चक्कर येणं, मळमळ, उलटी, जुलाब लागू शकतात. काविळसारख्या आजाराची लागण होऊ शकते.  किडनी आणि लिव्हरवरही वाईट परिणाम होऊ शकतो. इतकच नाही तर विषबाधा जास्त झाल्यास मृत्यूही ओढावू शकतो. 
 
असं असतानाही केवळ श्रद्धेच्या आहारी जाऊन भाविक प्रसाद म्हणून हे पेढे आणि मिठाई खरेदी करतात. मात्र डोळे झाकून घेतलेला हा प्रसाद तुम्हाला हॉस्पिटलची वारीही घडवू शकतो. त्यामुळे उघड्यावरील दुकानातून पेढे घेऊ नका. पेढे किंवा मिठाई खात्रीशीर असलेल्या नामांकित दुकानातूनच घ्यावेत. पेढे घेताना एक्सपायरी डेट पाहावी. पेढे घेताना तारखेसह आपल्या नावाने बिल घ्यावं. पेढे दुधापासून बनवले की नाहीत याची खात्री करून घ्यावी. 


भेसळमाफियांना कोणताही धर्म नसतो. पैशांसाठी ते वाट्टेल त्या थराला जाऊ शकतात. लोकांच्या श्रद्धेच्या फायदा घेऊन त्यांनी थेट देवाच्या प्रसादातच भेसळ केलीय. गणेशोत्सव काळात भेसळखोरांचा उच्छाद सुरू होईल. त्यामुळे तुम्ही सतर्क राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या.


त्र्यंबकेश्वरमध्येही भेसळयुक्त पेढा
त्र्यंबकेश्वरमध्ये भीमाशंकर मंदिर परिसरातही मलाई पेढे विकले जात होते. पांढरे स्वच्छ जणू काही दुधापासून बनवलेल्या मलईचे वाटावेत असे हे पेढे विक्रिला होते. मात्र हे पेढे दुधापासून किंवा दुधाच्या मलई पासून नव्हे तर गुजरातमधून विकल्या जाणाऱ्या रिच स्वीट डिलाइट अनलॉग नावाच्या अन्न पदार्थापासून तयार केल्याचे समोर आलं आहे. हा पदार्थ दुधाची स्कीम पावडर आणि पाम तेलापासून बनवले जात होते.