मुंबई : मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा करणाऱ्या ७ प्रमुख तलावांपैकी असलेला तानसा तलाव आज (२० ऑगस्‍ट, २०२०) सायंकाळी ७.०५ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणखी एक दिलासा मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तानसा तलाव गेल्यावर्षी २५ जुलै, २०१९ ला ओव्हर फ्लो झाला होता. तर २०१८ मध्‍ये १७ जुलै रोजी आणि २०१७ मध्‍ये १८ जुलै रोजी भरला होता. यंदा तलाव भरायला उशीर झाला असला तरी समाधानकारण वाढ झाली आहे.



मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण पाणी क्षमता ही सुमारे साडेचौदा दशलक्ष लीटर आहे. आज सकाळपर्यंत सातही तलावातील जलसाठा हा १२ लाख ६२ हजार ११९ दशलक्ष लीटर्स इतका असून तो क्षमतेच्‍या ८७.२० टक्‍के एवढा आहे.


तानसा तलाव आणि मध्य वैतरणा धरण भरल्याने मुंबईकरांची एका वर्षाची पाण्याची चिंता मिटली आहे.