कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टास्कफोर्स
टास्क फोर्समध्ये जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांचे टास्क नियुक्त केले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक जिल्हात नियुक्त करण्यात येणार्या या टास्कफोर्समध्ये डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ यांचा समावेश करण्यात येणार आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपचार, उपाययोजना त्याचप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणे आणि त्यांचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरावर हा टास्कफोर्स काम करणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात असे टास्क फोर्स नियुक्त करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यत आल्या आहेत.