ऋचा वझे, झी २४ तास, मुंबई :  या युद्धाची झळ आता तुम्हा-आम्हाला बसू लागलीये. आपल्या लाडक्या चहालाही (Cutting Tea) महागाईची उकळी फुटलीये. चहा का महाग झाला आणि आता टपरीवरचा चहा किती रुपयांना मिळणार आहे हे आपण जाणून घेऊयात. (tea rate hike due to gas cylinder tea powder and milk rate increasing) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरमागरम, वाफाळता आणि तरतरीत करणारा टपरीवरचा कटिंग चहा महागला आहे. गरिबाचा, सामान्यांचा, श्रीमंतांचा. तुमचा-आमचा हवाहवासा चहा महागलाय. दूध, साखर, गॅस, चहा पावडर या सगळ्यांच्याच किमती वाढल्यानं चहाही त्यांच्या वरातीत सामील झाला. चहासाठी लागणारे सगळेच जिन्नस महागल्यानं टपरीवरच्या चहाची किंमत वाढवण्याचा निर्णय चहा-कॉफी असोसिएशननं घेतलाय. 



चहाला महागाईची 'उकळी' 


नामांकित कंपन्यांनी चहा पावरडच्या किमती वाढवल्या. विविध कंपन्यांचं आणि डेरीतल्या दुधाची किंमतीही दोन रुपयांनी वाढली. गॅस सिलिंडरचे दर वाढले. त्यामुळे सगळ्याचे चटके चहाला बसले.  8 रुपयांना मिळणारा चहा आता 10 रुपयांना मिळणार आहे. तर 10 रुपयांना मिळणारा चहा आता 12 रुपयांना मिळणार आहे. चहाबरोबर कॉफीही महागलीय. कॉफीच्या दरात 2 ते 5 रुपयांनी वाढ झालीय. 


चहाबरोबर कॉफी, बिस्किटं, ब्रेड, मॅगी आणि वडापावही महागलेत. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या नाश्त्यालाच तुमचा महागाईशी सामना होणार आहे. घराबाहेर पडल्यावरही चहाची तलफ आलीच तर गरमागरम कटिंगसाठी खिसा हलका करण्याची तयारी ठेवा.