मुंबई : पालकांनो तुमची मुलं काय करतात यावर तुमचं लक्ष आहे का...? हे आम्ही का विचारण्याचं कारण म्हणजे मुंबईत घडलेली ही धक्कादायक घटना. मुंबईतल्या दादरमध्ये 14 वर्षांच्या ऑनलाईन गेमच्या (Online Game) नादात जीव गमावला आहे. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या या मुलाला फ्री फायर या ऑनलाईन गेमचा नाद लागला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालकांनी मुलाला ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल दिला होता. पण त्या मुलाला ऑनलाईन गेम खेळण्याचा नाद लागला. या मुलाचे वडील एका बांधकाम कंपनीत डिझायनर म्हणून कामाला आहेत. रविवारी आत्महत्येपूर्वी या मुलाने वडिलांना फोन केला. पण आई-वडिल बाईकर असल्याने ते फोन उचलू शकले नाहीत.


त्यानंतर त्यांनी मुलाला फोन केला पण त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आई-वडिलांना तातडीने घराकडे धाव घेतली. पण घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी दरवाजा ठोठावला पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून वडिलांनी खिडकी तोडून घरात प्रवेश केला. पण घरात प्रवेश करताच त्यांना जबर धक्का बसला. मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांनी याबाबतची माहिती भोईवाडा पोलिसांना दिली आहे.


तो मुलगा खेळत असलेल्या ‘फ्री फायर’ या ऑनलाइन गेमवर केंद्र सरकारने नुकतीच बंदी आणली आहे. पण फ्री फायर खेळावर भारतात बंदी असूनही त्याच्याकडे हा गेम कसा आला? त्याच्या सोबत आणखी कोण खेळत होते याचा तपास सुरु आहे.