मुंबई : Temples open: राज्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढला आणि दीड वर्ष कोरोना संकट ओढावले. नाईलाजास्तव मंदिर बंद होतीत. पहिल्या लाटेत लोकांची मानसिकता वेगळी होती आता वेगळी आहे. मंदिरे उघडलेली आहेत, मात्र नियमावली आहे. कोरोना जाऊदे सगळीकडे आनंदाचं वातावरण राहूदे हेच मागणं आहे, अशी प्रार्थना राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सिद्धिविनायकाचे दर्शन केल्यानंतर केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटस्थापनेच्या मुहुर्तावर आज राज्यातली मंदिरे खुली झाली आहेत. त्यामुळे नवरात्रीनिमित्त राज्यातल्या साडे तीन शक्तीपीठांमध्ये भाविकांची गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज अजित पवार यांनी सिद्धिविनायक मंदिरात गणपतीचे दर्शन केले. त्याचवेळी अजित पवार यांनी धोक्याचा इशाराही दिला आहे. आता पॉझिटिव्ह केसेस किती येतात त्यावर पुढचं अवलंबून आहे. कोरोनामुळे सगळं ठप्प झाले होते. आता कुठे सुरळीत होत आहे. त्यामुळे प्रत्येकांने सावधानता बाळगळी पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.



निवडणुकीत यश चांगले मिळाले 


सगळीकडे एकत्र लढलो नाही, आमची तिघांची मतं एकत्र केली तर ती जास्त होतात. आता राजकीय, भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. जनतेने आम्हाला समाधानकारक निकाल दिला खूप आनंदी नाही आणि खूप दुःखही नाही, अशी प्रतिक्रिया राज्यातील सहा जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूक निकालावर दिली. यावेळी त्यांनी भविष्यात तिघांनी (राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना) एकत्र लढले पाहिजे, असे संकेत दिले आहेत.


ही काय मोघलाई आहे का?


Lakhimpur Kheri Violence : उत्तर प्रदेशमध्ये (UP) शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. वास्तविक अशी परिस्थिती बघितली नाही. दुर्दैवाने मार्ग अजून निघालेला नाही. ही काय मोघलाई लागली आहे का, शेतकरी वाऱ्यावर उघड्यावर पडला आहे का, याचा निषेध म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या बाजूने यासाठी 11 तारखेला महाराष्ट्र बंद पुकारला आहे, अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली. 


अजित पवार यांचा केंद्रीय टीमला टोला


राज्यात पावसाने मोठे नुकसान झाले. आता पंचनामे चालले आहेत लवकर सहकार्य आणि मदत मिळावे म्हणून शेतकरी आग्रही आहेत. कोल्हापुरात पूर आला होता. याला आता अडीज झाले. त्यानंतर आता अडीज महिन्यांनी केंद्रीय टीम आली होती एवढ्या उशिरा येऊन उपयोग नसतो, असा टोला अजित पवार यांनी हाणला.