ठाकरे सरकारमध्ये `या` आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता
शिवसेनेकडून मुंबईतील अधिकाअधिक आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई: ठाकरे सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा सोमवारी पार पडणार आहे. यावेळी एकूण ३६ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येईल. यामध्ये शिवसेनेचे १३ ( १० कॅबिनेट+ ३ राज्यमंत्री) राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ (१० कॅबिनेट+ ३ राज्यमंत्री) आणि काँग्रेसचे १० (८ कॅबिनेट+ २ राज्यमंत्री) आमदारांचा समावेश आहे. हा शपथविधी सोहळा विधान भवनाच्या प्रांगणात पार पडणार आहे.
मात्र, मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार, याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. या मंत्रिमंडळाची संभाव्य यादी समोर आली आहे. त्यानुसार महाविकासआघाडीने नगर वगळता राज्याच्या इतर विभागांमध्ये मंत्रिपदे देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक ध्यानात घेता शिवसेनेकडून मुंबईतील अधिकाअधिक आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेस
उत्तर महाराष्ट्र – के. सी. पाडवी
मराठवाडा – अशोक चव्हाण, अमित देशमुख
पश्चिम महाराष्ट्र – सतेज पाटील, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे
विदर्भ – विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार
मुंबई – वर्षा गायकवाड \ अमिन पटेल
राष्ट्रवादी काँग्रेस
पश्चिम महाराष्ट्र – अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे
विदर्भ – अनिल देशमुख
ठाणे – जितेंद्र आव्हाड
मुंबई – नवाब मलिक
मराठवाडा – धनंजय मुंडे, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे
कोकण – आदिती तटकरे
उत्तर महाराष्ट्र – डॉ. किरण लहामटे
शिवसेना
मुंबई – अनिल परब, रविंद्र वायकर, सुनील प्रभू, सुनील राऊत
कोकण – उदय सामंत, भास्कर जाधव, वैभव नाईक
पश्चिम महाराष्ट्र – शंभुराजे देसाई, प्रकाश अबिटकर
मराठवाडा – संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत
विदर्भ – आशिष जैसवाल, संजय रायमुलकर, बच्चू कडू, संजय राठोड
ठाणे – प्रताप सरनाईक
उत्तर महाराष्ट्र – गुलाबराव पाटील, दादा भुसे, सुहास कांदे
यापूर्वी २८ नोव्हेंबरला शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील प्रत्येकी दोन आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. तेव्हापासून संपूर्ण राज्याचे लक्ष मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याकडे लागले होते. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार यांच्याकडे गृहमंत्रीपद दिले जाणार का, हे पाहणेदेखील महत्वाचे ठरेल.