ठाणे-कल्याण, जोगेश्वरी-कांजूर मेट्रोला हिरवा कंदील
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मेट्रो-5 आणि मेट्रो-6 ला मंजुरी देण्यात आलीय.
मुंबई : राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मेट्रो-5 आणि मेट्रो-6 ला मंजुरी देण्यात आलीय.
ठाणे-भिवंडी-कल्याण असा मेट्रो-5 चा मार्ग 24.9 किलोमीटरचा असेल. त्यावर एकूण 17 स्टेशन असतील. प्रकल्पासाठी सुमारे आठ हजार कोटींचा खर्च येणार असून पाच वर्षात प्रकल्प मंजूर करण्यात येईल.
तर मेट्रो-6 च्या माध्यमातून समर्थ नगर जोगेश्वरी ते कांजूरमार्ग असे एकूण 14 किमीमीटरचे अंतर मेट्रोनं जोडण्यात येईल. या प्रकल्पासाठी सहा हजार 672 कोटी रुपये खर्च होणार आहेत. या मार्गावर एकूण 13 स्टेशन असतील.