मुंबई : केंद्रीय कृषी कायद्यांची सक्ती करणारं केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांना न भेटता गोव्याला गेलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर शरद पवारांनी आज जोरदार भडीमार केला. आंदोलन करणारे शेतकरी हे कृषी कायदे आणि केंद्र सरकार या दोघांनाही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा पवारांनी दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषि धोरणांच्या विरोधात आझाद मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चात ते बोलत होते.. कंगनाला भेटण्यासाठी राज्यपालांना वेळ आहे, पण लाखो शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, अशा शब्दांत पवारांनी राज्यपालांना टोले लगावले.



कृषी कायद्याचा निषेध नोंदवण्यासाठी ठिकठिकाणाहून शेतकरी आझाद मैदानात   काही शेतकरी अजूनही पोहचतायत. कोल्हापूरहून आलेल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणा देत आझाद मैदानात पोहचले.


मुंबईत आझाद मैदानात शेतकऱ्यांचा एल्गार आज होणार आहे. आझाद मैदानात राज्यभरातून हजारो शेतकरी दाखल झालेत. आज सभा झाल्यावर ते राजभवनाकडे कूच करतील. मात्र त्याआधी आज सकाळी न्याहारी करून शेतकरी आंदोलक सज्ज झालेत. आदिवासी शेतकऱ्यांना पारंपरिक नृत्य करत आंदोलन स्थळी ताल धरलाय.