कृष्णात पाटील / मुंबई : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे (NCP) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील आरोपानंतर राजकारणात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर पक्ष त्यांच्या पाठिशी राहणार असल्याचे सूत्रांची माहिती आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितेल की, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाचे स्वरुप गंभीर आहेत. पक्ष म्हणून निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनंजय मुंडे काल मला स्वत: भेटले. यावेळी त्यांनी प्रकरणाची संपूर्ण माहिती मला दिली असे शरद पवारांनी यावेळी सांगितले. तसेच तक्रारीचे स्वरुप गंभीर असल्याचे सांगत सूचक वक्तव्य केले आहे. पवार हे मीडियाशी बोलत होते. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची गरज नसल्याची पक्षाची भूमिका आहे. असे आरोप झाल्याने राजीनामा घेतला तर तोच पायंडा पडेल अशी पक्षाची धारणा आहे. उद्या कुणीही कोणाविरुद्ध खोटे आरोप करेल तर राजीनामा घ्यायचा का? राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खलबते सुरु आहे. तर दुसरीकडे पक्षातून राजीनाम्या घेण्याबाबत दबाब वाढला आहे.


तर दुसरीकडे बलात्काराचे आरोप झालेले मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका (NCP's support for Dhananjay Munde) घेतली आहे. मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची गरज नसल्याची पक्षाची भूमिका आहे. धनंजय मुंडेंच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका घेतली आहे. तसे पक्षाच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे. रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत राष्ट्रवादीने तातडीची बैठक घेतली. या बैठकीत अन्य विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी धनंजय मुंडे यांच्या पाठिशी उभे राहण्याचे ठरविले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तशी खलबते झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे.  धनंजय मुंडे यांनी याबाबत खुलासा केला आहे. आम्ही कोणीही याप्रकरणात हस्तक्षेप करणार नाही. भाजप वेगवेगळ्या मागण्या करत आहेत, भाजपचे हे काम आहे, पण मंत्रिमंडळात फेरबदलाची आवश्यकता नाही, वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.