संचारबंदीतही बारमध्ये छमछम; सहा बारबालांसह एका तृतीयपंथीयाची पोलिसांकडून सुटका
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केलेल असताना, अनेक ठिकाणी गर्दी जमवण्याचे उद्योग थांबत नसल्याचे दिसून येत आहे.
मीरा-भाईंदर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केलेल असताना, अनेक ठिकाणी गर्दी जमवण्याचे उद्योग थांबत नसल्याचे दिसून येत आहे. भाईंदरच्या मानसी बार वर छापा टाकून सहा बारबालांसह एका तृतीयपंथीयाचीची पोलिसांनी सूटका केली आहे.
भाईंदरच्या मानसी बारवर काशीमीरा पोलिसांनी धाड टाकून बारमध्ये असलेल्या २१ जणांवर अटकेची कारवाई केली आहे. ऐन संचार बंदीत काल मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास पोलिसांना या बारमध्ये ग्राहकांना बोलावून बारबालांचा छमछम डान्स सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी बारच्या मागच्या दरवाजातून धाड टाकली असता त्यांनी बार मध्ये असलेले ८ बारचालक व १३ ग्राहकांना ताब्यात घेतले. यावेळी ऑर्केस्ट्रा बार मध्ये असलेल्या छुप्या खोलीतून पोलिसांनी सहा बारबाला व एका तृतीयपंथ्याची सुटका केली.
या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात २१ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक केली आहे.