Reliance Industries Latest Update :  देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळावर अंबानीची नवीन पिढीचा समावेशचा वाद अखेर संपला आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानींच्या नियुक्तीबाबत प्रॉक्सी ॲडव्हायझरीने प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. इंटरनॅशनल प्रॉक्सी सल्लागार फर्म इन्स्टिट्यूशनल शेअरहोल्डर सर्व्हिसेस इंकने अनंत अंबानींच्या नियुक्तीविरुद्ध मत देण्याचा सल्ला शेअरधारकांना दिल्या होता. त्यामुळे अनंत यांच्या मंडळातील सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. यापूर्वीही, सल्लागार फर्म IiAS ने देखील अनंत अंबानींच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता. (The controversy over Anant Ambanis age has finally been resolved isha akash and anant ambani on board of reliance industries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IiAS ने 9 ऑक्टोबरला दिलेल्या अहवालात अनंत अंबानी वयाच्या 28 व्या वर्षी नियुक्ती आमच्या मतदान मार्गदर्शक तत्त्वांनुसार नाही, असं सांगण्यात आलं होत. त्याशिवाय त्यांचा अनुभवदेखील कमी आहे. मात्र ईशा आणि आकाशच्या बोर्ड प्रवेशाच्या प्रस्तावांना सल्लागाराने पाठिंबा दिला होता. पण आता या वादावर पडदा पडला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळावर अखेर अनंत अंबानी, ईशा आणि आकाशाचा समावेश करण्यात आला. शेअरधारकांनी अनंत अंबानी याच्या पारड्यात 92.7 टक्के मतं दिली. त्यामुळे अनंत यांची संचालक मंडळात एन्ट्री झाली. 


46 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत काय निर्णय झाला होता?


रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 46 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक 28 ऑगस्ट 2023ला पार पडली होती. या बैठकीत रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी संचालक मंडळातील बदलाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर बोर्ड ऑफ डायरेक्टर्समधून नीता अंबानींना कौल दिला. तर ईशा, आकाश आणि अनंत अंबानी हे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून बोर्डात सहभागी होतील असं ठरलं होतं. 


नव्या पिढीकडे कोणती जबाबदारी?


देशातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष असलेले आकाश अंबानी आता जिओ प्लॅटफॉर्म्सचे चेअरमन राहणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, जिओ प्लॅटफॉर्म्सच्या अंतर्गत रिलायन्स जिओ इन्फोकॉम येते. तर आकाशची जुळी बहीण ईशा ही रिलायन्सच्या रिटेल शाखेसाठी तर धाकटा मुलगा अनंत नव्या ऊर्जा व्यवसायाकडे लक्ष देणार आहे. तर दुसरीकडे रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेतील घोषणेनुसार नीता अंबानी पदावरून पायउतार होतील. मात्र त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत.