बार्ज P-305 दुर्घटनेतील मृतांचा आकडा 70 वर, नौदलाकडून अजूनही शोधकार्य सुरु
समुद्रात बुडालेले अवशेष शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे.
मुंबई : अरबी समुद्रात बुडालेल्या बार्ज पी-305 दुर्घटनेतील मृतांचा आकडा 70 वर पोहोचला आहे. समुद्रात बुडालेल्या बार्ज P-305 ला आयएनएस मकर वरील विशेष टीमने पूर्णपणे तपासले आहे. आतमध्ये एकही मृतदेह नसल्याचं समोर आलं आहे. बुडालेल्या बार्ज P-305 मध्ये मृतदेह आहेत का याचा तपास करण्यासाठी नौदलाने विशेष पथक तैनात केलं होतं. पण यामध्ये एकही मृतदेह नसल्याचं नौदलाने स्पष्ट केलं आहे.
समुद्रात बुडालेले अवशेष शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे. तसंच समुद्रात इतर मृतदेहांचा शोध देखील सुरु आहे.
तोक्ते चक्रीवादळात पी-305 बार्ज पाण्यात बुडाल्याने यावर काम करणाऱ्या अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. नौदला माहिती मिळताच नौदलाने अतिशय कठीण परिस्थिती येथून अनेकांना सुखरुप परत आणलं. नौदलाने 188 जणांना सुखरुप आणलं असून या दुर्घटनेत आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झालाची माहिती पुढे आली आहे.
उर्वरित कर्मचाऱ्यांचा समुद्रात अजूनही शोध सुरु आहे. इतक्या तासांनंतर वाचण्याची शक्यता कमीच आहे. पण तरी देखील नौदल मृतदेह शोधण्याचं काम करत आहे. भारतीय नौदलाच्या आयएनएस मकरद्वारे ड्रायव्हर समुद्रात त्यांचा शोध घेत आहेत.
गेल्या काही दिवसात अनेक मृतदेह हे रायगडमध्ये किनाऱ्यावर वाहून आले आहेत. या मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. पण बार्ज-305 वरील बेपत्ता कर्मचाऱ्यांचे हे मृतदेह असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केली जाणार आहे.