भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी
नुकतेच जामीन मिळलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत छगन भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
मुंबई : नुकतेच जामीन मिळलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत छगन भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत जाधव यांनी केली आहे. जयंत जाधव आणि पंकज भुजबळ यांनी काल मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आणि ही मागणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन छगन भुजबळांच्या जीवाला धोका असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची विनंती केली.
भुजबळ रुग्णालयातून घरी
दरम्यान, छगन भुजबळ यांना आज मुंबईतल्या रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे केईएम रुग्णालयातून भुजबळ सांताक्रुझच्या घरी रवाना झाले. तब्बल सव्वा दोन वर्षानंतर भुजबळ घरी परत येत आहेत. दोन दिवस आराम केल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. पण त्यांच्यावर उपचार करणारे खासगी डॉक्टर सध्या परदेशात आहेत. त्यामुळे भुजबळ सध्या घरीच थांबणार आहेत.
पी चिदम्बरम यांचा मुलगा बाहेर कसा?
मनी लाँन्ड्रीगचे आरोप असलेला पी चिदम्बरम यांचा मुलगा कार्ति आठ दिवसात जामिनावर तुरुंगाबाहेर येतो मग भुजबळ यांना अडीच वर्षे का लागली ? असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केलाय. छगन भुजबळ राजकीय विरोधक आहेत, पण त्यांच्याशी व्यक्तिगत दुष्मनी नाही. बाळासाहेबांची साथ ज्यांनी सोडले त्या प्रत्येकाची वाताहत झाली, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.