नवी दिल्ली : काँग्रेसची पहिली यादी ५ सप्टेंबरला जाहीर होणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. काँग्रेसच्या छाननी समितीची दिल्लीत बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेतला. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीत १० जागांवर वाद आहे. तर वडेट्टीवारांकडून प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. मनात नाही नांदणे आणि पोवाळे मांडणे, असे आंबेडकरांचे झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक उमेदवारासंदर्भात काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक दिल्लीत झाली. काँग्रेसची पहिली यादी ५ सप्टेंबरला जाहीर होणार आहे. तीन तासांहुन अधिक वेळ झाली, अशी माहिती मिळाली. आता आंबेडकर म्हणतात, मला मुख्यमंत्री घोषित करा. कडूनिंबाच्या पाल्यात साखर घातली तरी गोड होत नाही. आंबेडकर यांच्या मनांत काय कडू आहे माहीत नाही, भाजपला मदत होईल असे आंबेडकर वागत आहेत. त्यांनी वेळोवेळी भूमिका बदलली. त्यांचा अल्टिमेटम आम्ही मानत नाही, असे वडेट्टीवार म्हणालेत.


चर्चा दहा वादग्रस्त जागांवर अडकली


दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील जागा वाटपाची चर्चा सध्या दहा वादग्रस्त जागांवर अडकली आहे. या दहा जागांवर दोन्ही पक्षांनी दावा सांगितल्याने दोन्ही पक्षातील चर्चा पुढे सरकताना दिसत नाही. २८८ पैकी २१२ जागांचे वाटप दोन्ही पक्षात पूर्ण झालंय. यातील १०६ जागा काँग्रेस आणि १०६ जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. 


यात २०१४ साली दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या बहुतांश जागा आणि ज्या ठिकाणी २०१४ साली दोन नंबरच्या जागांचा समावेश आहे. तर इंदापूरसारख्या १० जागांवर दोन्ही पक्षांनी दावा सांगितल्याने त्याचे वाटप रखडले आहे. उरलेल्या ६६ जागा मित्र पक्षांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. यात शेकाप, स्वाभीमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, बसपा यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीच्या प्रतिसादाची वाट बघितली जात आहे.