मुंबई : प्रत्येक व्यक्तीच्या जीवानात निराशाचे क्षण येत असतात. काही खचून जातात तर काही आशा कायम ठेवून यशाच्या मार्गावर पुढे जातात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनातही एक अशी घटना घडली ज्यातून ते निराश झाले होते. ते इतके खचले की त्यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या एका वादळाने एकनाथ शिंदे यांची धैर्य तुटलं होतं. सर्वत्र अंधार दिसत होता. निराश होऊन त्यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुष्य रोज नवनवीन रूपं दाखवत असतं. अंधार पडल्यानंतर पहाटही होतेच. कोणी ना कोणी त्याचे माध्यम बनते. असेच एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे हे त्यांच्या आयुष्यात एक माध्यम बनले. त्यांचे मन वळवले आणि पुन्हा शिंदे यांचा राजकारणात प्रवेश झाला.


महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अगदी सामान्य कुटुंबातील व्यक्ती. एका गरीब कुटुंबात जन्मलेले शिंदे यांचे वडील एका कार्डबोर्ड कंपनीत काम करत होते. आई गृहिणी होत्या. या सर्व अडथळ्यांना झुगारून 58 वर्षीय एकनाथ शिंदे यांनी शिक्षण सुरू ठेवले. त्यांचे शालेय शिक्षण ठाण्यातील मंगला हायस्कूलमधून झाले. 2020 मध्ये शिंदे यांनी बीएची पदवी मिळवली. ज्यात त्यांना 77 टक्के गुण मिळाले. म्हणजे राजकारणात असताना ही अभ्यासासाठी वेळ काढत ते यशस्वी झाले. एकनाथ शिंदे यांनी कुटुंबाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अनेक कामे केली. मजुरी केली. रिक्षा ही चालवली.


एकनाथ शिंदे यांनी कधीही राजकारणात येण्याचा विचार केला नाही. त्यांचे बालपण ठाण्यात गेले. तीन भावंडे असलेले शिंदे मात्र सुरुवातीपासूनच लोकांना मदत करण्यासाठी ओळखले जात होते. पण राजकारणात येण्यामागे एक कारण होतं. शिंदे हे ठाण्यातील किसन नगर वागळे स्टेट 16 मध्ये राहत होते. येथे महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत होते. त्यावर मात करण्यासाठी शिंदे यांच्या मित्रांनी त्यांना राजकारणात येण्यास सांगितले.


ऑटो ड्रायव्हर ते नगरसेवक


एकनाथ शिंदे यांनी ऑटो चालवायला सुरुवात केली. या दरम्यान ते लोकांमध्ये मिसळत होते. एकदा शिंदे यांचे राजकीय गुरु आनंद दिघे या भागात आले. तेथे त्यांनी जनतेला या भागातून कोणाला नगरसेवक निवडून आणायचे आहे, असा सवाल केला. त्यावर तेथे उपस्थित मुस्लीम व हिंदूंनी शिंदे यांचे नाव पुढे केले. मग काय, येथून शिंदे यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.


मुलांच्या मृत्यूने खचले


पण असं म्हणतात की आयुष्यात सुखानंतर दु:खही येते. तर शिंदे यांच्याबाबतीतही तेच झाले. त्यांच्या आयुष्यात दु:खाचे वावटळ आले. वास्तविक 2 जून 2000 रोजी शिंदे यांचा 11 वर्षांचा मुलगा दिपेश आणि 7 वर्षांची मुलगी शुभदा यांना घेऊन सातारा येथे गेले होते. येथे त्यांनी मुलांना बोटिंगसाठी नेले. पण इथे एक अपघात झाला. या अपघातात त्यांची दोन्ही मुले डोळ्यासमोर बुडाली. या अपघाताने शिंदे यांच्या अंगावर काटा आला. निराशेच्या गर्तेत त्यांनी स्वत:ला कैद केले होते. त्यांना या नैराश्यातून बाहेर काढून पुन्हा राजकारणात आणण्याचे काम त्यांचे आनंद दिघे यांनी केले. शिंदे पुन्हा हळूहळू राजकारणात सक्रिय झाले आणि आज महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले.


जीवनात किती ही दु:ख आले तरी खचून जावू नका. अशी शिकवण आज एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळते.


वन संघर्षात दडलाय यशाचा धडा