मुंबई : जमिनीच्या मालकीपोटी द्यावा लागणारा प्रीमियम थकवणाऱ्या १८ बिल्डर्सवर मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगरालाय. झी २४ तासच्या बातमीचा जोरदार दणका बिल्डर्सना बसलाय. त्यांना लेखी म्हणणं मांडण्याची अखेरची संधी देण्यात आलेय.


३५७ कोटींचा प्रिमियम थकवला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 प्रीमियम थकवणाऱ्या १८ बिल्डरांवर बीएमसीनं कारवाईचा बडगा उगारलाय. ३५७ कोटींचा प्रिमियम थकवल्याप्रकरणी बिल्डरांना काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. बीएमसीच्या मालकीच्या जमिनीवर पुनर्विकास राबवणाऱ्या बिल्डरांना यामुळे चांगलाच दणका देण्यात आलाय. 


बिल्डरांना  शेवटची संधी


जमिनीच्या मालकीपोटी द्यावा लागणारा प्रीमियम थकवल्यानं बीएमसीनं ही कारवाई केली. 'झी २४ तास'नं बिल्डरांनी बीएमसीचे पैसे थकवल्याची दाखवली होती. यानंतर ही कारवाई कऱण्यात आलीय. बिल्डरांना लेखी म्हणणं मांडण्यास शेवटची संधी देण्यात आलीय. यानंतर बीएमसी नव्यानं निविदा मागवून प्रकल्प पूर्ण करणार आहे.