मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडीवर टीका करता 1 जानेवारीपर्यंत महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होईल, अशी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबरपर्यंत देश कोविड मुक्त करण्याचा लक्ष्य निश्चित केलं आहे. त्याचप्रमाणे 31 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील 40 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढून 1 जानेवारीपर्यंत महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणार अशी घोषणा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच दिवाळी आज असली तरी पाडवा मात्र 1 जानेवारीला होणार, असा सूचक इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे. 


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वसूलीमधून जो पैसा लाटला तो कंपनीमध्ये गुंतवणूक केला. पण जो हिस्सा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिला आहे तो अद्याप पुढे यायचा आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आह. माझ्यावर दहा-दहा खटेल दाखल केले, पण मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आव्हान करतो की त्यांनी शंभर मानहानीचे दावे दाखल केले तरी महाराष्ट्र घोटाळेमुक्त करुनच राहणार, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. सिंह यांच्यावर 17 प्रकरणं दाखल केली आहेत, असं असताना परमबीर सिंह यांनी प्रतिज्ञापत्रात केलेले दावे गांभार्याने का घेता, असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.