मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची मूभा देण्यात आली आहे. दोन डोस घेतलेल्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने रेल्वे व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर येत्या 28 ऑक्टोबरपासून लोकल पूर्ण क्षमतेने म्हणेज 100 टक्के फेऱ्या सुरु होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सध्या एकूण क्षमतेच्या 95.70% लोकल फेऱ्या सुरू आहेत त्यात आता वाढ होऊन 100% लोकलच्या फेऱ्या सुरू होणार. मध्य रेल्वेवर सध्या 1702 फेऱ्या सुरु आहेत, त्या वाढवून 1774 फेऱ्या होणार आहेत. तर पश्चिम रेल्वेवर सध्या 1304 फेऱ्या सुरु आहेत, त्या आता 1367 इतक्या होणार आहेत. असं असलं तरी डोसचे निर्बंध कायम राहणार आहेत. 


दोन डोस घेतलेल्यांना मुभा


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असतानाच अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यात लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना 15 ऑगस्टपासून रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. पण यासाठी प्रवाशांना केवळ मासिक पास दिले जात आहेत.