मुंबई : Trending News:  तुम्ही एखाद्याला मोठी रक्कम ट्रान्सफर करत असाल, पण चुकून ती दुसऱ्याच्याच खात्यात गेली तर? तुम्ही परताव्याची विनंती करण्यासाठी त्या व्यक्तीशी संपर्क साधाल, पण जर त्याने नकार दिला तर काय? चुकीच्या खात्यात पैशांचा व्यवहार हा आपल्यापैकी अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे. फक्त एक नंबर बदलल्याने परिस्थिती बदलू शकते, मुंबईतील एका महिलेसोबत नेमके असेच  काहीसे घडले. मीरा रोड येथील 38 वर्षीय महिलेने चुकीच्या बँक खात्यात 7 लाख रुपये चुकून पाठवले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेने चुकीच्या खात्यात 7 लाख रुपये पाठवले. परत मागितल्यावर व्यक्ती म्हणाली, मी लॉटरी जिंकलो, देणार नाही ! त्यामुळे या महिलेला डोक्याला हात लावण्याशिवाय पर्याय उरला नाही. तिनेही निर्धार केला आणि सायबर पोलिसात तक्रार केली.


महिलेचे पैसे चुकीच्या खात्यात गेले


विशेष म्हणजे ट्रान्सफर करताना त्रुटी राहिल्याने लॉटरी जिंकल्याचा दावा करत पैसे मिळालेल्या व्यक्तीने परत देण्यास नकार दिला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कथित घटना 29 जून रोजी घडली. मीरा रोड येथील महिलेने नातेवाईकाला पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. महिलेने चुकून चुकीचा खाते क्रमांक टाकला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही रक्कम मुंबईतील दुसऱ्या खातेदाराला पाठवण्यात आली. आपली चूक लक्षात आल्यानंतर महिलेने बँकेशी संपर्क साधला, मात्र त्यांनी तिची चूक सांगून तिला मदत करण्यास नकार दिला.


व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला


30 जून रोजी महिलेने वसई विरार पोलिसांच्या सायबर सेल विभागाकडे सहकार्य मागितले. यानंतर पोलिसांनी खातेदाराचा शोध घेतला आणि पीडित महिलेचे पैसे परत करण्यास सांगितले. प्रथम लाभार्थ्याने लॉटरी जिंकल्याचा दावा करुन पैसे परत करण्यास विरोध केला. पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिल्यानंतर त्या व्यक्तीने व्यवहार पूर्ववत करण्याचे मान्य केले. या महिलेच्या खात्यात दोन दिवसांनी 2 जुलै रोजी पैसे परत आले.