मुंबई : किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) , त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या ( Medha Somaiya ) यांनी युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून पैसे खाल्ले आहेत. विक्रांत घोटाळ्याचे ते आरोपी आहेत. ते जामिनावर सुटले आहेत. आरोपातून नाही, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjya Raut ) यांनी केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुणी कितीही मोठ्याने ओरडले तरी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे खोटे ठरत नाहीत. आम्ही केलेले आरोप खरे आहेतच, त्या आरोपांवरून लक्ष विचलीत करण्यासाठी हे केलं जात आहे. 


देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्यात आले. सोमय्या कुटूंबियांना कोट्यावधी रुपये आले. आार्थिक गुन्हे विभागाकडे हा विषय गेला आहे त्यामुळे त्यांची भागंभाग सुरू आहे.


सोमय्या विक्रांत घोटाळ्यांचे आरोपी आहे. ते सध्या जामिनावर सुटले आहे. युवक प्रतिष्ठानने केलेला शौचालाय घोटाळा मोठा आहे. यातून कोट्यावधी रूपये गोळा करण्यात आले. हा माणूस जामिनावर बाहेर आहे. वसुली गँगचे प्रमुख किरीट सोमय्या आहे. यात विधान परिषदेच्या आणखी दोन आमदारांची नावे आहेत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.